महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आजही आम्ही एकमेकांचा आदर करतो, मलायकासोबतच्या नात्यावर अरबाजची प्रतिक्रिया - relationship

आम्ही संपूर्ण विचार करून घटस्फोट घेतला आहे. अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत घालवली. त्यामुळे आमच्या अनेक आठवणी आहेत, त्यामुळे आजही आम्ही एकमेकांचा तितकाच आदर करत असल्याचं अरबाजनं म्हटलं आहे.

मलायकासोबतच्या नात्यावर अरबाजची प्रतिक्रिया

By

Published : Jul 19, 2019, 11:40 PM IST

मुंबई- अरबाज खान आणि मलायका अरोरा या जोडीने काही दिवसांपूर्वीच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर मलायका आणि अर्जून कपूरच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. तर अरबाजही सध्या मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. मात्र, अजूनही मी आणि मलायका एकमेकांचा आदर करतो, असं अरबाजानने नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

आम्ही संपूर्ण विचार करून घटस्फोट घेतला आहे. अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत घालवली. त्यामुळे आमच्या अनेक आठवणी आहेत, त्यामुळे आजही आम्ही एकमेकांचा तितकाच आदर करत असल्याचं अरबाजनं म्हटलं आहे. एकमेकांच्या काही गोष्टी पटत नसल्याने आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांचा तिरस्कार करतो. असंही तो म्हणाला.

अरबाज आणि मलायका १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघांना अरहान नावाचा १६ वर्षांचा मुलगाही आहे. २०१६ साली अरबाज आणि मलायकाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ११ मे २०१७ साली ते विभक्त झाले. मात्र, हा निर्णय आम्ही आमचा आणि कुटुंबीयांचा विचार करूनच घेतला असल्याचे दोघंही अनेकदा सांगत असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details