नवी दिल्ली- माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दुबई भेटीच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी दुबई एक्स्पोच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये 'भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाची ग्लोबल रीच' या विषयावर अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत संवाद साधला. ठाकूर म्हणाले की, दुबईत राहणारे भारतीय हे भारताचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. ते म्हणाले की या एक्सपोमधील भारताचा मंडप 17 लाख अभ्यागतांसह प्रचंड गर्दी खेचणारा ठरला आहे. देश भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही उत्सव साजरा होत असल्याचे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर डान्सही केला.भारताच्या सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शनमध्ये चित्रपटांच्या योगदानाची कबुली देताना, ठाकूर म्हणाले की भारत ही कथाकथनाची भूमी आहे आणि भारतीय चित्रपट उद्योगाने परदेशातील लोकांवर मोठा प्रभाव पाडला आहे.
भारतीय कंटेंट जागतिक स्तरावर आपली उपस्थिती दाखवण्याच्या मार्गावर आहे, हे सांगताना रणवीर सिंग म्हणाला, “भारतीय मनोरंजन जागतिक स्तरावर स्फोट करणार आहे. आमच्या कथा लोकांशी भिडतात, सांस्कृतिक सीमा ओलांडतात आणि परदेशातील भारतीयांना चित्रपटांद्वारे भारताशी जोडतात.'' संभाषणादरम्यान रणवीर सिंग नुकत्याच प्रदर्शित झालेल्या RRR चित्रपटाबद्दल म्हणाला, 'उदाहरणार्थ RRR पहा, तो एकटाच सर्व बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विभागत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे'.