मुंबई- पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी आज नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड कलाकारांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. यात अभिनेता अनुपम खेर यांचाही सहभाग आहे.
मोदींच्या शपथविधीबद्दल अनुपम खेर म्हणतात, हा तर ऐतिहासिक कार्यक्रम - delhi
अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर छत्तीसगढमधून ४६ हजार ९७० मतांनी निवडून आल्या आहेत.आज या शपथविधीच्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा मला अभिमान असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाबद्दल अनुपम खेर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. देशाने आपाला मतदानाचा हक्क बजावत हे सरकार निवडले आहे. किरण खेरदेखील या संसदेची सदस्य आहे आणि नरेंद्र मोदी देशाचा नक्कीच विकास करतील. आज या शपथविधीच्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा मला अभिमान असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर छत्तीसगढमधून ४६ हजार ९७० मतांनी निवडून आल्या आहेत. दरम्यान अनुपम खेर यांच्याशिवाय विवेक ओबेरॉय, कंगना रनौत, बोमन इराणी, हेमा मालिनी यांसारखे अनेक कलाकार या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.