मुंबई- बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि पत्नी सुनिता कपूर यांच्या लग्नाचा आज ३५ वा वाढदिवस आहे. अनिल यांनी या निमित्ताने पत्नीसोबतचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत त्याला खास कॅप्शन दिले आहे. जे सर्वांचीचं मनं जिंकणारं आहे.
तु माझं प्रेम होती, आहे अन् शेवटच्या श्वासापर्यंत राहशील, अनिल कपूरची पत्नीसाठी पोस्ट - love
आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अनिल कपूर यांनी आपलं हृदय आयुष्यभरासाठी सुनिता यांना दिलं आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या गोष्टींपैकी सर्वात सुंदर गोष्ट तू आहेस, असे म्हणते अनिल यांनी पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अनिल कपूर यांनी आपलं हृदय आयुष्यभरासाठी सुनिता यांना दिलं आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या गोष्टींपैकी सर्वात सुंदर गोष्ट तू आहेस. आपण सोबत घालवलेलं आयुष्य खूप साहसी आहे. तू माझं प्रेम होतीस, आहेस आणि कायम राहशील, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आज मी जिथे आहे आणि जे काही आहे, ते तुझं प्रेम आणि नेहमी तू माझ्यासोबत खंबीरपणे उभी असल्यानंच आहे.
डेटींगचे ११ आणि लग्नानंतरचे ३५ वर्ष असे ४६ वर्ष माझ्यासोबत घालवण्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत मला पुढचे ४६ वर्षही जगायचे आहे, असे म्हणते अनिल यांनी पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सोनमनेही आपल्या सोशल मीडियावरून या दोघांना शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे.