मुंबई - बॉलिवूडचे चिरतरूण व्यक्तीमत्व म्हणजे अनिल कपूर. आज त्यांची पत्नी सुनिता यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर खास शुभेच्छांची एक पोस्ट शेअर केली आहे.
अनिल कपूर यांनी सुनिता यांच्यासोबतचा तारूण्यातला फोटो शेअर करत त्यावर खास कॅप्शन दिले आहे. 'तुझ्यामुळे माझे आयुष्य दररोज अधिकाधिक चांगले बनले आहे. माझ्या आनंदाचे कारणही तूच आहेस. तू खूप सुंदर आहेस. तू माझ्या आयुष्यात असल्याने मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा', असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनम कपूरनेही आईसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. सोनम, रिया आणि हर्षवर्धन हे तिघेही या फोटोत सुनीतासोबत आहेत. सोनमने या फोटोसोबत लिहिले आहे की, 'तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तू माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेस. तू नेहमीच माझ्या पाठिशी उभी राहिली आहे, मला मदत केली आहेस. माझ्या आयुष्यात ज्यावेळी समस्या आल्या, त्यावेळी तू त्याला खंबीरपणे तोंड दिले. तुझ्यामुळेच आपले कुटुंब आज इतके खूश आहे. आम्ही सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतो'.