मुंबई - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुर्भवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलेब्स सेल्फ क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंग याचा सल्ला देत आहेत.आपल्या घरात थांबून ही लढाई जिंकू शकतो हा विश्वास ते बोलून दाखवत आहेत. यामध्ये आता अभिनेता संजय दत्त आणि अनिल कपूर सहभागी झालेत. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.
अनिल कपूप यांनी म्हटलंय, ''आपण सर्व जण जाणता की आपण महामारीच्या कठिण प्रसंगातून जात आहोत. अशावेळी स्वतःला सुरक्षित राखायचे असेल तर आपल्याला मिळून काही करायला हवे. फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या आसपासच्या लोकांसाठी काही गोष्टींचे पालन करायला हवे. एक छोटेसे पाऊल जीवन वाचवू शकते. प्लिज घरी राहा. सोशल डिस्टन्सिंग राखा.''