मुंबई- निखळ विनोदी आणि कौटुंबिक नाट्याचा मुलामा असलेल्या अनिल कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या 'मुबारका' चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज २ वर्ष पूर्ण झाली. याच निमित्ताने अनिल कपूर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते चित्रपटातील आपल्या काही टीम मेंबर्ससोबत दिसत आहेत.
'मुबारका'ला २ वर्ष पूर्ण, पोस्ट शेअर करत अनिल कपूरने केली सिक्वलची घोषणा - अनिल कपूर
या व्हिडिओमधून 'मुबारका'च्या सिक्वलची घोषणाही करण्यात आली आहे. या किंवा पुढच्या वर्षीच्या ख्रिस्मला या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे अनिस बझ्मी यात सांगत आहेत.
यात त्यांच्यासोबत ईलियाना, अनिस बझ्मी आणि मुराद खेतानी आहेत. आज मुबारकाला चार वर्ष पूर्ण झाली आणि योगायोगाने चित्रपटाच्या टीममधील आम्ही चौघेही हैदराबादमध्ये आहोत. आताच बिर्याणी खाऊन आम्ही हा दिवस साजरा केला आहे. मात्र, टीममधील इतर सदस्यांना आणि अर्जुन कपूर, अथिया शेट्टीला आम्ही मिस करत आहोत, असं ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.
याशिवाय या व्हिडिओमधून 'मुबारका'च्या सिक्वलची घोषणाही करण्यात आली आहे. या किंवा पुढच्या वर्षीच्या ख्रिस्मला या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे अनिस बझ्मी यात सांगत आहेत. दरम्यान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९३.५९ कोटींचा गल्ला जमावला होता. अशात आता प्रेक्षक याच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत.