मुंबई- अनीस बझ्मी यांच्या 'पागलपंती' चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हैदराबादमध्ये हे चित्रीकरण केलं गेलं. बझ्मींनी चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच सर्वांचं कौतुकही केलं आहे.
'पागलपंती'चं हैदराबादमधील चित्रीकरण पूर्ण, बझ्मींनी शेअर केली पोस्ट - अर्शद वारसी
पूर्ण स्टारकास्ट आणि टीमचं जितकं कौतुक करेल, ते कमीच आहे. वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. हसत खेळत आम्ही ५ दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण केलं, असं बझ्मींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पूर्ण स्टारकास्ट आणि टीमचं जितकं कौतुक करेल, ते कमीच आहे. वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. हसत खेळत आम्ही ५ दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण केलं, असं बझ्मींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर त्यांची हीच पोस्ट शेअर कर पुलकीत सम्राट म्हणाला, काय शेड्यूल होतं, काय अनुभव होता, काय टीम होती...टीमसोबतचा प्रत्येक दिवस आमच्या पागलपंतीमध्ये गेला.
दरम्यान अनिस बझ्मींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात पुलकीत सम्राट, क्रिती खरबंदा, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ, अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.