मुंबई- दिग्दर्शक अनीस बझ्मी सध्या आपल्या 'पागलपंती' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. दरम्यान बझ्मी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी 'मुबारका' या चित्रपटाचा विचार आपण पंधरा वर्षांपूर्वीच केला असल्याचे म्हटलं आहे.
पंधरा वर्षांपूर्वीच केला होता 'मुबारका' चित्रपटाचा विचार, बझ्मींचा खुलासा - आथिया शेट्टी
दिग्दर्शक अनीस बझ्मींनी अर्जुन कपूरसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे, की पंधरा वर्षांपूर्वी आम्ही 'नो एन्ट्री'च्या सेटवर बसून 'मुबारका' बनवण्याचा विचार करत होतो.
त्यांनी अर्जुन कपूरसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे, की पंधरा वर्षांपूर्वी आम्ही 'नो एन्ट्री'च्या सेटवर बसून 'मुबारका' बनवण्याचा विचार करत होतो. एवढं मोठं नियोजन कदाचित आजपर्यंत कोणीच केलं नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान २०१७ साली आलेल्या मुबारका चित्रपटात अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि आथिया शेट्टी या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर बझ्मी यांनी या सिनेमाच्या सिक्वलचीही घोषणा केली आहे. या किंवा पुढच्या वर्षी ख्रिस्मसला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.