महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हे राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा कमी नाही, अमिताभनं दिलेल्या शुभेच्छांवर आयुष्मान-विकीची प्रतिक्रिया - महानायक अमिताभ बच्चन

अमिताभ आणि जया बच्चन यांनी दोन्ही कलाकारांना पुष्पगुच्छ पाठवत अभिनंदन केलं आहे. यावर आयुष्मानने याचा फोटो शेअर करत लिहिलं, महानायकाकडून जेव्हा तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशंसा मिळते, तेव्हा ती राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा कमी नसते.

By

Published : Aug 14, 2019, 6:17 PM IST

मुंबई- आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल या दोन्ही कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशात आता अमिताभ यांनी केलेल्या अभिनंदनानंतर या कलाकारांनी हे आमच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हणत पोस्ट शेअर केली.

अमिताभ आणि जया बच्चन यांनी दोन्ही कलाकारांना पुष्पगुच्छ पाठवत अभिनंदन केलं आहे. यावर आयुष्मानने याचा फोटो शेअर करत लिहिलं, महानायकाकडून जेव्हा तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशंसा मिळते, तेव्हा ती राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा कमी नसते. अमिताभ सर आणि जया मॅम आभारी आहे.

तर विकीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, हे माझ्यासाठी जग जिंकल्याप्रमाणे आहे. धन्यवाद अमिताभ सर आणि जया मॅम. विकीला 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' तर आयुष्मानला 'अंधाधून' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details