महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

HBD Big B : ऐंशीच्या उंबरठ्यावरील अमिताभ म्हणतात, 'साठा तो पाठा, अस्सी तो लस्सी..!!' - अमिताभ यांनी म्हातारपण नाकारले

अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस साजरा होत आहे. बच्चन यांनी आपला एक फोटो शेअर करुन आपण ऐशींत पदार्पण करीत असल्याचे चांहत्यांना सांगितले आहे. यासाठी त्यांनी एका मजेशीर हिंदी म्हणीचा दाखल दिला आहे.

अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस
अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस

By

Published : Oct 11, 2021, 4:21 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आपल्या वयाच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी मेगास्टार आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिताभ यांनी सोशल मीडियावर आपले वाढते वय अभिमानाने साजरे केले. त्याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या वयाचा उल्लेखही केला आहे.

या फोटोत अमिताभ यांच्या खांद्यावर स्लिंग बॅग दिसत आहे. पुढील वर्षी ऐंशीत प्रवेश करणार असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. बच्चन यांनी लिहिलंय, '80 च्या दिशेने वाटचाल करत आहे ...'

अमिताभ यांनी ट्विटरवर फोटो शेअर करीत एक मजेशीर हिंदी म्हण लिहिली आहे.

जब साठा (60 ) तब पाठा

जब अस्सी (80) तब लस्सी !!!

या प्रसिद्ध म्हणीद्वारे अमिताभ यांनी त्यांचे म्हातारपण नाकारले आहे.

आता वयाच्या 79 व्या वर्षीही, मेगास्टारची सक्रियता त्यांच्या या फोटोतील शीर्षकाला अनुसरून आहे. त्यांचा फिटनेस आणि फॅशन हे वाढत्या वयाबरोबर अमिताभ तरुण होत असल्याचे जणू पुरावेच आहेत. अमिताभच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक चाहत्यांनी बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

एका युरजने लिहिलंय, 'सर, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहात. मला आयुष्यात कितीही त्रास झाला तरी मी हार मानू नये, मी हे तुमच्याकडून शिकलो आहे. '

दुसऱ्याने बिग बींना दीर्घ आणि निरोगी आयुष्याची शुभेच्छा दिली आहे.

त्यांच्या ट्विटर वॉलवर अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी कविता लिहिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - BIG B BIRTHDAY बॉलीवुडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, 'या' सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर गाजविले अधिराज्य

ABOUT THE AUTHOR

...view details