मुंबई -महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मात्र, बॉलिवूडमधील एक अभिनेता त्यांचा खूप आवडता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर आहे. अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासोबतचा एक जुना आणि एक आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याची प्रशंसा केली आहे.
बिग बींनी रणबीरसोबतचा ३० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. 'अजूबा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांच्यासोबत रणबीरने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. तर, दुसऱ्या फोटोत आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या सेटवरील रणबीरचा लुक पाहायला मिळतो.
हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं
अमिताभ यांनी हे दोन्ही फोटो शेअर करुन रणबीरचं कौतुक केलं आहे. १९९० ते २०२० या काळात रणबीरमध्ये बरेच बदल झाल्याचे या फोटोमधून पाहायला मिळते.