मुंबई- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय आजही प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतो. मात्र, अभिनयाप्रमाणंच अमिताभ यांच्या लिखाणालाही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळते. बिग बी अनेकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कवितेच्या काही ओळी शेअर करतााना दिसत असतात.
अमिताभ म्हणतायेत, 'जिनके चरित्र अच्छे होते हैं वो वादे निभाते हैं' - quotes
अमिताभ यांचे हे ट्विट बहुतेक वेळा सामाजिक संदेश देणारे तर अनेकदा समाजातील वास्तव मांडणारे असतात. आपल्या दैनंदिन जीवनाशी या ओळी निगडीत असल्यानं याला चाहत्यांचीही पसंती मिळते.
हे ट्विट बहुतेक वेळा सामाजिक संदेश देणारे तर अनेकदा समाजातील वास्तव मांडणारे असतात. आपल्या दैनंदिन जीवनाशी या ओळी निगडीत असल्यानं याला चाहत्यांचीही पसंती मिळते. नुकतंच अमिताभ यांनी आणखी एक खास ट्विट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे.
'जिनके इरादे अच्छे होते हैं वो वादे करते हैं, जिनके चरित्र अच्छे होते हैं वो वादे निभाते हैं', असं अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास अमिताभ नुकतेच बदला चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यानंतर आता ते 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहेत.