महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

१ लाख दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी बिग बींचा मोठा हात, करणार महिन्याचा राशन पुरवठा - amitabh bachchan latest news

सोनी पिक्चर्सचे प्रबंध निर्देशक आणि सीईओ एन पी सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

amitabh bachchan helps to daily wage farmer
१ लाख दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी बिग बींचा मोठा हात, करणार महिन्याचा राशन पुरवठा

By

Published : Apr 6, 2020, 1:05 PM IST

मुंबई - सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे कलाविश्वातील बरेच कलाकार आर्थिक मदतीसाठी समोर आले आहेत. लॉकडाऊनमुळे दैनंदिन मजुरांचेही हाल होत आहेत. चित्रपट, मालिका तसेच इतर कार्यक्रम रद्द झाल्यामुळे यासाठी काम करणारे मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सलमान खान, शाहरुख खाननंतर आता महानायक अमिताभ बच्चन देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी तब्बल १ लाख दैनंदिन मजुर असणाऱ्या कुटुंबाला महिन्याचा राशन पुरवठा करणार असल्याची घोषणा केली आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्स यांनी अमिताभ बच्चन यांच्या या कार्याची प्रशंसा केली आहे.

अमिताभ बच्चन या दैनंदिन मजुरांना किती राशन पुरवठा करणार आहेत, याबाबत त्यांनी काही खुलासा केला नाही.

सोनी पिक्चर्सचे प्रबंध निर्देशक आणि सीईओ एन पी सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

आपण सर्व एक कुटुंब आहोत. आता या कुटुंबाला आणखी मोठे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कॅप्शन देऊन बिग बींनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details