मुंबई- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी नागराज मंजुळेच्या 'झुंड' चित्रपटापाठोपाठ 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं. गेल्या आठवड्यातच या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आणि याचवेळी अमिताभ यांनी सेटवरील काही फोटो शेअर करत आता पुढील प्रवासासाठी म्हणजेच केबीसीसाठी सज्ज झाल्याचं म्हटलं.
देवियो और सज्जनो, 'केबीसी'च्या अकराव्या पर्वासाठी अमिताभ सज्ज
अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केबीसीला सुरू होऊन १९ वर्ष झाली, यात शो चे अकरा सीझन पूर्ण झाले आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं, असं अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
आता या केबीसीला लवकरच सुरूवात होणार असून अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केबीसाला सुरू होऊन १९ वर्ष झाली, यात शोचे अकरा सीझन पूर्ण झाले आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं, असं अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
तर केबीसीच्या सेटवरीलच आपला दुसरा फोटो शेअर करत, बीती हुई पुरानी बातों से जब हमें मुक्ति मिलती है , तभी जाकर एक नवल दृष्टिकोण से परिचय होता है; और उसमें ख़ुशी मिलती है, असं त्यांनी म्हटलं आहे. आता या नव्या सीझनची आणि अमिताभ यांच्या देवियो और सज्जनोची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.