महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिरची लेक पुन्हा चर्चेत, या फोटो मुळे सोशल मीडियावर ट्रोल - Amir khan daughter Ira khan

इरा खान ने काही महिन्यांपूर्वी शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. मात्र व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच लाईमलाईटमध्ये राहते.

By

Published : Apr 2, 2020, 9:57 AM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये बरेच स्टारकिड्स चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही स्टारकिड्स ट्रोल देखील होतात. तरीही त्यांच्या फोटोंची मात्र चर्चा बरेच दिवस रंगलेली असते. अभिनेता आमिर खानची लेक इरा देखील यापैकीच एक आहे.

इरा खानने काही महिन्यांपूर्वी शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. मात्र व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच लाईमलाईटमध्ये राहते. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हा फोटो विमानतळावर काढलेला आहे. मात्र, सध्या कोरोना विषाणू मूळे सर्व देशभरात लॉक डाऊन असताना इराच्या या फोटो ने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे सेलेब्रिटी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आघाडीच्या अभिनेत्याची मुलगी कोणतीही खबरदारी न बाळगता विमानतळावर स्पॉट होते, यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details