मुंबई- आलिया भट्टचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपट ३० जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा सामना प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राधे श्याम चित्रपटाशी होणार आहे.
एसएलबीच्या चित्रपटाला बाहुबली स्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित रोमँटिक राधे श्याम चित्रपटाशी सामना करावा लागेल, हा चित्रपट बहुभाषिक असून हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
बुधवारी भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले असून त्यात आलिया भट्ट साडी नेसलेले असून लाल रंगाची बिंदी, नाकात नथ आणि वेणी घातलेली आहे.