मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा मंगळवारी वाढदिवस पार पडला. त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टने त्याच्यासाठी वाढदिवसाची एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर रणबीरसोबतचा एक स्वप्नाळू फोटो पोस्ट केला आहे. हे लव्ह बर्ड्स सुजान जवई येथील कॅम्पमध्ये सुर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहेत.
फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "हॅपी बर्थडे माय लाइफ". आलियाने वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते भरभरुन व्यक्त होत आहेत. या जोडीच्या प्रशंसकांनी आलियाच्या कमेंट सेक्शनला हृदय आणि फायर इमोजींनी भरून टाकले आहे. केवळ चाहतेच नाही तर आरकेची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनीही तिच्या पोस्टवर हार्ट इमोटिकॉन्स टाकले आहेत.
तिने चित्र पोस्ट केल्यानंतर लगेचच, सेलिब्रिटी मनीष मल्होत्रा, अंगद बेदी, अनुष्का शर्मा आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी टाकल्या.