मुंबई- बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. या जोडप्याचे चाहते त्यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. दोघांनी आता जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे, त्यामुळे चाहते आणखीनच उत्साहित झाले आहेत. रणबीर कपूरने आधीच लग्नाबाबत आपले मत मांडले आहे. आता आलियानेही रणबीरसोबतच्या लग्नाबाबत आपले विचार ठेवत सर्व काही स्पष्ट केले आहे.
सध्या आलिया भट्ट तिच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि चित्रपटातील ढोलिडा गाण्यात आलियाच्या अवताराने धमाल केली आहे. आलियाचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असून या संदर्भात प्रमोशनदरम्यान आलियाने रणबीरसोबतच्या लग्नाबाबत सर्व काही उघडपणे सांगितले आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने बॉयफ्रेंड रणबीरला ग्रीन सिग्नल दिला आहे. राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने लॉकडाऊनमुळे लग्नास विलंब होत असल्याचे सांगितले होते. आता आलियाने मुलाखतीत म्हटले आहे की, रणबीरची ती गोष्ट चुकीची नव्हती. आलिया पुढे म्हणाली की, तिने विचाराने आणि मनाने रणबीरशी लग्न केले आहे.