मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टने महाशिवरात्रीच्या निमित्ताने जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या आठवड्याच्या सुरुवातीला तिचा प्रियकर रणबीर कपूरला कोरोनाची बाधा झाली होती. या पार्श्वभूमीवर तिच्या या दर्शनाकडे पाहिले जात आहे.
आलियाने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यात तिचा हात रणबीरच्या हातात गुंतलेला दिसत आहे. याच्या खॅप्शनमध्ये तिने मेजर मिसींग असे लिहिले आहे. या फोटोला आतापर्यंत १५ लाख लाईक्स मिळाल्या आहेत. रणबीर कपूरला कोरोनाबाधा झाल्यानंतर तो आपल्या घरीच क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहे.
सध्या अशी चर्चा आहे की आलिया आणि रणबीर लग्नानंतर पाली हिल्समध्ये नव्या घरात राहायला जाणार आहेत. गेल्या महिन्यात आरकेची आई नीतू कपूर यांच्याबरोबर दोघांनाही बांधकामस्थळावर पाहण्यात आले होते.