मुंबई- बॉलिवूड कलाकार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल करण्यास टाळाटाळ करत होते. RRR प्रमोशन दरम्यान आलियाने रणबीरवर प्रेम करीत असल्याची वारंवार कबुली दिल्यानंतर, आलियाने तिच्या भावना जगाला कळवण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे!
आलिया आणि रणबीर नुकतेच त्यांच्या नवीन वर्षाच्या सुट्टीवरून परतले. रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये या जोडप्याने नवीन वर्षाचे स्वागत केले. रणबीर आतापर्यंत अधिकृतपणे सोशल मीडियापासून दूर राहण्यात यशस्वी झाला आहे, तर आलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिच्या उपस्थितीचा स्मार्ट वापर करते. आलियाने यापूर्वी रणबीरसोबतच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिची नवीन पोस्ट मात्र रणबीरच्या फोटोग्राफी कौशल्याची प्रशंसा करणारी आहे.