मुंबई- बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार अशी ओळख असणारा अक्षय सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांशिवाय सामाजिक कामांत हातभार लावल्यानेही अनेकदा चर्चेत असतो. अनेकदा गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावत तो त्यांना आर्थिक मदत करत असतो. आता पुन्हा एकदा अक्षयनं पुरग्रस्तांची मदत करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय आला धावून, इतके कोटी करणार दान - cm fund
सध्या आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काझीरंगा अभयारण्याचा अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे. ही परिस्थिती मन हेलावणारी आहे.
सध्या आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काझीरंगा अभयारण्याचा अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे. ही परिस्थिती मन हेलावणारी आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा परिणाम तेथील नागरिकांवर आणि प्राण्यांवर होत आहे.
या कठिण काळात त्यांना मदतीची गरज आहे. मी कांझीरंगा पार्कसाठी १ तर आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी दान करत असल्याचे अक्षयने म्हटलं. तुम्ही सर्वांनीही पुरग्रस्तांसाठी आणि कांझीरंगा नॅशनल पार्कच्या बचावासाठी दान करावं, असं आवाहन अक्षयने चाहत्यांना केलं आहे. अक्षयच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.