मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चित्रपटांसोबतच आपल्या फिटनेसमुळेही विशेष चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देताना दिसतो. अशात आज आपल्या वाढदिवशी अक्षयनं आपला एक शर्टलेस फोटो शेअर करत आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.
एकच आयुष्य मिळालंय, ते नीट जगा; वाढदिवशी अक्षयनं शेअर केली पोस्ट
नैसर्गिक पद्धतीनेच बॉडी बनवण्याचं आवाहन चाहत्यांना करत त्याने बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंट न घेण्याचाही सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये अक्षय म्हणाला, आपण ज्याप्रमाणे खातो तसंच आपण बनतो
याशिवाय नैसर्गिक पद्धतीनेच बॉडी बनवण्याचं आवाहन चाहत्यांना करत त्याने बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंट न घेण्याचाही सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये अक्षय म्हणाला, आपण ज्याप्रमाणे खातो तसंच आपण बनतो. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंटचा वापर करु नका.
तुमच्या शरीरासोबत प्रामाणिक राहा, तरच ते या वयातही तुम्हाला हवी त्यापद्धतीने तुमची काळजी घेईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी दोन मुलांचा बाप आहे. काळजी घ्या. एकच आयुष्य मिळालं आहे, ते नीट जगा, असं अक्षय आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.