महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवीन चित्रपटासाठी अजय देवगणचा ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक! - अलीम हकीम

अजय देवगण याने दाढी ‘ट्रिम’ करून घेतली असून एक अफलातून ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक त्याने धारण केला आहे. या लूक-चेंज पाठी आहे प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम.

http://10.10.50.85//maharashtra/19-July-2021/mh-mum-ent-ajay-devgn-alim-hakim-saltandpepper-beard-look-mhc10001_19072021010429_1907f_1626636869_309.jpeg
नवीन चित्रपटासाठी अजय देवगणचा ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक!

By

Published : Jul 19, 2021, 2:22 AM IST

बॉलिवूड सध्या स्थित्यंतरातून जाताना दिसतोय. ‘हिरो-सेंट्रिक’ चित्रपटांपासून दूर जात आशयघन विषयांवर चित्रपट बनताना दिसताहेत. त्याचप्रमाणे हल्ली चित्रपटसृष्टीतील सितारे आपल्या भूमिकांवर आणि त्यातील लूकवर मेहनत घेताना दिसताहेत. आता अजय देवगणचंच बघाना, तो आपल्या चित्रपटांवर थोडी जास्त मेहनत घेताना दिसतो. लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडताना तो मास्क वापरताना दिसला. त्याच्या मास्क आडून त्याच्या दाढीतले काळे व पांढरे केस डोकावतानाही दिसले. फोटोग्राफर्स आणि इतरांना वाटत होते की, कदाचित त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी तो तशी दाढी वाढवत असेल किंवा त्याला दाढी करण्याचाच कंटाळा आला असेल.

परंतु आता त्याचे गुपित बाहेर आले आहे. त्याने नुकतीच त्याची दाढी ‘ट्रिम’ करून घेतली असून एक अफलातून ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक त्याने धारण केला आहे. या लूक-चेंज पाठी आहे प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम. अजयने ‘याच लूकसाठी केला होता दाढी वाढविण्याचा आणि ती लपविण्याचा अट्टाहास’. या लूकमुळे अजयच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठा फरक जाणवतोय आणि या लूकमधील त्याची व्यक्तिरेखा नक्कीच उठावदार होईल.

अजय देवगनचा नवा लूक
अलीम हकीमकडे खूप मोठमोठे स्टार्स हेयरकट आणि हेयरस्टाइलिंगसाठी येतात. त्याने अजयला एक अनोखा शार्प लूक दिला असून तो पाहिल्यावर अजय खूप खुश झाला. त्याने अजयला दाढीसोबतच व्यक्तिरेखेला साजेसा हेयरकटसुद्धा दिला असून कदाचित लवकरच ‘त्या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत आहे. काही महिन्यांपूर्वी अजयने हिंट दिली होती की त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याला ‘केसांवर’ काम करावे लागणार आहे. सूत्रांकडून असेही कळते की या लूकला अजून वेगळ्यारीतीने पेश करण्यात येणार आहे, ज्यावर अलीम हकीम काम करीत आहे.
अजय देवगणचे ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ हे चित्रपट तयार असून तो ‘आर आर आर’, ‘मैदान’ या चित्रपटांचाही भाग आहे. अजय देवगण ‘मे डे’ या चित्रपटामध्ये काम करीत असून त्याचे दिग्दर्शनही करतोय आणि या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना अजय देवगणचा ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक आवडला असून तो मोठ्या पडद्यावर कधी दिसेल याची प्रतीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details