मुंबई- अजय देवगणचा रोमँटीक कॉमेडी चित्रपट 'दे दे प्यार दे..'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये अलोक नाथ यांचीही झलक पाहायला मिळाली. ज्यामुळे, प्रेक्षकांनी याबद्दल संताप व्यक्त करत ट्विटवरून अनेक प्रश्न केले आहेत.
'दे दे प्यार दे'मधील अलोक नाथांच्या भूमिकेवर अजयचं स्पष्टीकरण - de de pyar de
काही दिवसांपूर्वीच संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्यावर विनता नंदा यांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. असं असतानाही आलोक नाथ यांना चित्रपटात घेण्यामागे नेमके काय कारण आहे, असा सवाल अनेकांनी केला
काही दिवसांपूर्वीच संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्यावर विनता नंदा यांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. असं असतानाही आलोक नाथ यांना चित्रपटात घेण्यामागे नेमके काय कारण आहे, असा सवाल अनेकांनी केला. ट्रेलर लाँचिंग दरम्यान विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचे उत्तर अजयने दिले.
या चित्रपटाचे शूटींग आलोक नाथ यांच्यावर मीटू मोहिमेअंतर्गत आरोप होण्यापूर्वीच झाले असल्याचे सांगत अजयने या विषयावर काहीही बोलणं टाळलं आहे. दरम्यान अजय देवगन आणि तब्बू 'गोलमाल अगेन'नंतर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. तर निर्मिती लव रंजन, भूषण कुमार आणि अंकुर गर्ग यांची आहे.