मुंबई -महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली. सुदैवाने जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही बच्चन कुटुंबात अमिताभ आणि अभिषेक वगळता इतरांचे अहवाल निगेटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जया बच्चन यांच्यासह ऐश्वर्या, आराध्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह - जया बच्चन
महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली. सुदैवाने जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने जया बच्चन आणि ऐश्वर्या यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, बच्चन यांचे चाहते आणि इतर अभिनेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निर्माते बोनी कपूर, बॉलिवूड अभिनेते सोनू सूद, मलयालम अभिनेते ममूटी, तेलुगू अभिनेते महेश बाबू यांनी गेट वेल सून सर, असे ट्वीट करत प्रार्थना केली. दिग्गजांनी ट्विट करत अमिताभ व अभिषेक बच्चन यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.