महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2021, 2:17 PM IST

ETV Bharat / sitara

'लूप लपेटा’मधील ताहिर राज भसीनचा “रेट्रो गॉगल लूक” झाला प्रकाशित!

'लूप लपेटा’मधील ताहिर राज भसीनचा रंजक लूक सामायिक करण्यात आला आहे. नाकाची पिन आणि रेट्रो सनग्लासेस घातलेला ताहीर म्हणतो की त्याने या सिनेमात जोखीम पत्करणारा आकर्षक माणूस उभा केला. तो सत्या नावाची भूमिका साकारतोय तर तापसी साकारतेय सावी नामक व्यक्तिरेखा. ‘लूप लपेटा’ हा एका दरोड्यावर आधारित चित्रपट आहे.

Tahir Raj Bhasin's look in 'Loop Lapeta'
ताहिर राज भसीनचा 'लूप लपेटा’मधील लूक

मुंबई - काही दिवसांपूर्वीच तापसी पन्नूचा ‘लूप लपेटा’ मधील अनोखा लूक बाहेर आला होता व आता तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ताहिर राज भसीनचा रंजक लूक सामायिक करण्यात आला आहे. नाकाची पिन आणि रेट्रो सनग्लासेस घातलेला ताहीर म्हणतो की त्याने या सिनेमात जोखीम पत्करणारा आकर्षक माणूस उभा केला. तो सत्या नावाची भूमिका साकारतोय तर तापसी साकारतेय सावी नामक व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘लूप लपेटा’ हा एका दरोड्यावर आधारित चित्रपट आहे.

तापसी पन्नूचा ‘लूप लपेटा’ मधील अनोखा लूक
ताहिर म्हणतो, "सत्या एक अप्रामाणिक माणूस आहे. चित्रपटातील जोखमीचा पाठलाग करणार्‍या आकर्षक व्यक्तीची भूमिका साकारताना खूप आवडतेय. तो जीवनात आशावादी आहेच. तसे जीवन पूर्णपणे जगण्यात आनंद मानणारा आहे. त्याला नेहमीच वाटत असते की नियतीचा त्याच्यावर विश्वास आहे व ती नेहमीच त्याच्याबाजूने उभी राहते. त्याचा करड्या रंगाचा शर्ट, रेट्रो गॉगल आणि नाकातील ‘नथ’ घातलेला लूक त्याच्या बंडखोर व्यक्तीमत्त्वाला अनुरूप आहे.


ताहिरच्या पाठीमागे एक कापड गिरणी सेटिंगही दिसत आहे. याविषयी तो म्हणाला की, “हा सत्याचा लूक ‘लूप लपेटा’च्या एका बंद टेक्सटाईल मिलवर चित्रीत करण्यात आलेल्या दृश्यामधील हा फोटो आहे. दिग्दर्शक आकाश भाटियासाठी चित्रपटातील लोकेशन्स म्हणजे व्यक्तिरेखा आहेत. ते कथेच्या जगाविषयी आणि जागेबद्दल दृश्यमान विधानं करतात. होय, हे विशिष्ट लोकेशन कथानकात मध्यवर्ती भूमिका बजावते परंतु सत्या तिथे कशासाठी आणि का आहे याबद्दल कळण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागेल. या क्षणी मी एवढेच सांगू शकतो की हा एक अदभूत प्रवास असेल.”


‘लूप लपेटा’ मध्ये प्रथमच बॉलिवूडच्या हिरोची भूमिका साकारताना ताहिरला आनंदच होतोय. तो म्हणतो की, “बॉलिवूडचा ‘हिरो’ बनणे खूप रोमांचक होते. जेव्हा आपण बॉलिवूडचे चित्रपट बघत मोठे होतो तेव्हा तो अगदी परिचित प्रदेश असल्यासारखे वाटते. सत्या म्हणजे एकाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सावधगिरीचा इशारा दिला असतो तसा आहे . दिग्दर्शक आकाश भाटिया आणि निर्माते अतुल कसबेकर आणि तनुज गर्ग यांनी ही पटकथा साकारण्यासाठी शैली आणि सर्जनशीलतेत समतोल राखण्यासाठी आपले कसब पणाला लावले आहे. तापसी सोबतची ऑनस्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री बद्दल बोलायचे तिच्याकडून तर बरेच काही शिकायला मिळाले.”

"पीकू", "पॅडमॅन", "नीरजा" आणि "तुम्हारी सुलू" च्या निर्मात्यांचा आगामी, तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन अभिनित, रोमँटिक व थरार ने भरलेला चित्रपट ‘लूप लपेटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा - 'हे' आहे जॅकलिन फर्नांडिजच्या फिटनेसचे रहस्य

ABOUT THE AUTHOR

...view details