मुंबई- अभिनेता-निर्माता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पांचोलीला दिंडोशी सत्र न्यायालयाने १९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने पांचोलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आदित्य पांचोलीला अंतरिम जामीन मंजूर, बलात्कारप्रकरणी दाखल आहे गुन्हा - rape case
मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने पांचोली विरोधात बलात्कारची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पांचोलीला दिंडोशी सत्र न्यायालयाने १९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
पांचोली विरोधात ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत २७ जूनला गुन्हा दाखल केला होता. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्याविरूद्धचे पुरावे गोळा करणं कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पीडितेने आदित्यविरुद्ध गुन्हा दाखल करताना म्हटलं, ती १७ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नाही तर मदतीसाठी ती पोलिसांकडे गेली असता त्यांनी आदित्यला फक्त समज दिली आणि सोडून दिले. आदित्य पांचोली याआधीही अनेक वादांमुळे सतत चर्चेत असतो.