मुंबई -सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल अनेक षडयंत्रांच्या चर्चेत अभिनेता सूरज पंचोली सहभागी असल्याच्या चर्चा होत आहेत. याचे खंडन करीत सूरजने त्याला त्रास देणाऱ्यांच्या विरोधात व्हर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
खरं तर, दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नाव आल्याने नाराज झालेल्या सूरज पांचोलीने तक्रार दाखल केली आहे. त्याच्या ७ पानांच्या तक्रारीत बनावट बातम्या फिरवून मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याच्याशी चौकशी न करता अनेक बातम्यांचा संबंध जोडला आहे. या प्रकारे त्याने काही मीडिया हाऊसेस आणि यु ट्यूबर्सची नावे सांगितली आहेत जे त्याच्याबद्दल बनावट बातम्या पसरवित आहेत.
तो म्हणाला की, मीडिया ज्या प्रकारे बनावट बातम्या प्रसारित करीत आहे, त्यातून त्रास होत आहे. अभिनेता पुढे म्हणतो की, तो दिशाला कधीच भेटला नाही. त्याचे नाव दोन मृत्यूंशी जोडण्याचे षडयंत्र इंटरनेटवर असून ते पूर्णपणे निराधार आहे. नुकतेच सूरजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यात म्हटलंय की त्याच्या बाजूला उभी असलेली मुलगी दिशा सालियान आहे.