मुंबई - महेश कोठारे यांचा ‘छकुला’ आदिनाथ ( Actor Adinath Kothare ) याने मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम जम बसविल्यावर आता त्याने बॉलिवूडवर लक्ष केंद्रित केले आहे. अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारेचा गेल्या वर्षी बॉलीवूड डेब्यू झाला. कबीर खान दिग्दर्शित 83 ( 83 directed by Kabir Khan ) या बिग बजेट मल्टिस्टारर सिनेमातून आदिनाथ एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला. तर नागेश कुकनूर ( Nagesh Kuknur ) दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रिम्स या हिंदी वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले. आदिनाथ आता नव्या कोणत्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून दिसेल याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत.
दरम्यान, आदिनाथने एक फोटो शेयर केलाय ज्यावरून त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता वाढली. त्याच्या रोहन सिप्पीसोबत नुकत्याच दिसलेल्या फोटोने आता ही उत्सुकता अधिकच चाळवली आहे. आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने भूमिकांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच तर बॉलीवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे.