मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने दिनेश विजान आणि जिओ स्टुडिओ प्रॉडक्शनचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘दसवी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरवात केली आहे. रितेश शाह यांनी लिहिलेल्या या चित्रपटातून तुषार जलोटा दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत.
अभिषेकने केवळ शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिलेली नाही तर त्याने दसवीतील आपला लूकही शेअर केलाय. ''भेटा गंगाराम चौधरी''ला असे लिहित त्याने 'दसवी'चे शूटिंग सुरू झाल्याचे ट्विटरवर म्हटले आहे.
अभिषेक 'दसवी' नावाच्या या चित्रपटात १० वीत अपयशी ठरलेला मुख्यमंत्री म्हणून काम करताना दिसणार आहे. दसवी हा आजच्या समाजातील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा एक राजकीय विनोदी नाट्यमय चित्रपट आहे. अभिषेक यामध्ये दहावीत अपयशी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक एका भ्रष्ट राजकारण्यांच्या प्रवासाची कथा यातून मांडणार असल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्राने सांगितले.
या चित्रपटामध्ये यामी गौतम आणि निमरत कौर यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. यात यामी हरियाणवी मुलीची भूमिका करणार असून यासाठी ती या भाषेचे धडे गिरवत आहे. तसेच दसवीच्या भूमिकेसाठी देहबोलीच्या बारीक गोष्टींमवरही काम करत आहे.
हेही वाचा - महाचित्रपट 'सूर्यपुत्र महावीर कर्ण'चा टायटल लोगो झाला अनावरीत !