महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बींसोबत पहिल्या शॉटसाठी भारावला आयुष्यमान खुराणा - Big B

'गुलाबो सिताबो' या चित्रपटात आयुष्यमान खुराणा पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करीत आहे. यामुळे तो भारावून गेलाय. शूजीत सरकार या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत.

गुलाबो सिताबो

By

Published : Jul 9, 2019, 3:36 PM IST


मुंबई - चतुरस्त्र अभिनेता आयुष्यमान खुराणा आगामी 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करीत आहे. बिग बीसोबतच्या पहिल्या सीन बाबत आयुष्यमान थोडासा चिंतीत आणि उत्साही आहे. आपला आदर्श अभिनेता असलेल्या अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करीत आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही.

आयुष्यमान म्हणतो, हा माझ्यासाठी जॅकपॉट आहे. मी स्वतःचा चिमटा काढत आहे. माझ्याकडे बच्चन सरांसोबत काम करण्याची आणि शिकण्याची संधी आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक शूजीत सरकार यांच्या विकी डोनारमधून आयुष्यमानला एका रात्रीत प्रसिध्दीस आला होता. त्याच शूजीतसोबत पुन्हा काम करण्याची संधी त्याला 'गुलाबो सिताबो' सिनेमातून मिळत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो, त्यांनी मला पहिला ब्रेक दिला, त्यांचा मी कायम ऋणी आहे. 'गुलाबो सिताबो' साठी त्यांनी मला निवडलाय त्याचा खूप आनंद झालाय.

अनेक नामवंत कलाकार असलेला 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details