मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. काही कलाकारांनी तर राजकारणात प्रवेश करत उमेदवारीदेखील मिळवली आहे. आता यापाठोपाठ बॉलिवूड कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी एकवटले आहेत.
'या' बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येत भाजपला दिला पाठिंबा.. - PM
दिल्लीतील भाजप कार्यालयात एकत्र येत या कलाकारांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यात बोनी कपूर, पुनम ढिल्लो, द ग्रेट खली आणि सपना चौधरीसह इतरही अनेक कलाकारांची समावेश आहे
'या' बॉलिवूड कलाकारांनी भाजपला दिला पाठिंबा
दिल्लीतील भाजप कार्यालयात एकत्र येत या कलाकारांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यात बोनी कपूर, पुनम ढिल्लो, द ग्रेट खली आणि सपना चौधरीसह इतरही अनेक कलाकारांची समावेश आहे. यावेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजदेखील उपस्थित होत्या. कलाकारांशिवाय इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी याठिकाणी हजेरी लावली.