अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूड सज्ज झाले आहे. ११ ऑक्टोबरला बिग बी यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर झुंबड उडाल्याचे दिसत आहे. अनेक सेलेब्रिटीजनी त्यांना शुभेच्छा द्यायला सुरूवात केली आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... पाहा, बिग बींच्या गाजलेल्या ५० भूमिकांचा कोलाज - Amitabh Bachan birth day
अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांना आजच शुभेच्छा द्यायला सुरूवात केली आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
निर्माता आनंद पंडित यांनी अमिताभ यांच्या फोटोंचा कोलाज व्हिडिओ बनवला आहे. यात बच्चन यांनी आजवर गाजवलेल्या ५० भूमिकांचे फोटो कलात्मकरित्या वापरले आहेत. या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय,
जमीन, आसमान, उजाले, अंधेरे, जिंदा रहेंग
जिस्म चले जायेंगे लेकिन चेहरे जिंदा रहेंगे
हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.