मुंबई- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आपली कोविड चाचणी निगेटिव्ह येण्याची प्रतीक्षा करीत होता. त्याने नुकतीच कोविड चाचणी केली असून तो निगेटीव्ह ठरला आहे. लवकरच तो पुन्हा एकदा शुटिंगच्या कामाला सुरुवात करेल.
कार्तिक आर्यनने सोमवारी इन्स्टाग्रामवर लिहिले की, ''निगेटीव्ह, १४ दिन का वनवास खतम🕺🏻 कामावर परतणार🦥,"
कार्तिक आर्यनची २२ मार्चला कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. आता त्याने आपली हेल्थ अपडेट दिल्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
वर्क फ्रंटवर, कार्तिक सध्या त्याच्या आगामी भूल भुलैय्या २ या चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. यात त्याच्यासोबत तब्बू आणि कियारा अडवानी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या भूल भुलैय्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. याशिवाय कार्तिकचा 'धमाका' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
अलीकडेच गोविंदा, अक्षय कुमार, परेश रावल, विकी कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रोहित सराफ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - बीजापूर चकमक : चारशे नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांना घेरुन केला हल्ला; अधिकाऱ्यांची माहिती