टोरंटो : सध्याच्या वातावरणात अनेकांना स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे स्मृतीभ्रंशाला टाळण्यासाठी विविध औषधोपचाराबाबत सुचवण्यात येते. मात्र व्हिटॅमीन डीच्या सेवनाने स्मृतीभ्रंश टाळण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी शोधून काढले आहे. याबाबत कॅनडातील कॅलगरी विद्यापीठ आणि यूकेमधील एक्सेटर विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे. या संशोधकांनी यूएस नॅशनल अल्झायमर समन्वय केंद्राच्या 12 हजार 388 पेक्षा अधिक नागरिकांमधील व्हिटॅमिन डी आणि स्मृतिभ्रंश यांच्यातील संबंधांचा शोध लावल्याचा दावा केला आहे.
व्हिटॅमिन डी पूरक आहार फायदेशीर :या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार या सहभागी नागरिकांचे सरासरी ७१ वर्षे वय होते. या नागरिकांच्या गटातील 37 टक्के नागरिकांनी व्हिटॅमिन डी पूरक आहार घेतला. त्यानंतर व्हिटॅमिन डी घेणाऱ्या नागरिक दीर्घकाळ स्मृतिभ्रंशमुक्त राहिल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. तर पूरक आहार घेणाऱ्या गटामध्ये 40 टक्के कमी स्मृतीभ्रंशाचे निदान झाल्याचेही या संशोधकांना आढळल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती अल्झायमर अँड डिमेंशिया: डायग्नोसिस, असेसमेंट आणि डिसीज मॉनिटरिंग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमूद करण्यात आली आहे.
व्हिटॅमिन डीचा होतो मेंदूवर प्रभाव :या संशोधनात सहभागी झालेल्या 2 हजार 696 नागरिकांना दहा वर्षांत स्मृतिभ्रंश झाला. त्यापैकी 2 हजार 017 म्हणजे 75 टक्के नागरिक स्मृतिभ्रंश निदानापूर्वी व्हिटॅमिन डीच्या आहार न घेणारे होते असेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले. व्हिटॅमिन डीचा मेंदूवर प्रभाव होतो. त्यामुळे स्मृतिभ्रंश कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, असेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले. मात्र आतापर्यंतच्या संशोधनाने परस्परविरोधी परिणाम दिलेले असल्याची माहिती कॅल्गरी विद्यापीठाचे प्राध्यापक झहिनूर इस्माइल यांनी दिली. यावेळी त्यांनी पुरुषांपेक्षाही स्त्रियांमध्ये व्हिटॅमीन डीचा प्रभाव अधिक होऊ शकतो, असेही इस्माईल यांनी यावेळी स्पष्ट केले.
आकलनशक्ती सामान्य असलेल्या लोकांमध्ये प्रभाव :या संशोधकांनी सामान्य आकलनशक्ती असलेल्या लोकांमध्ये याचा प्रभाव जास्त होता असल्याचे निदान केले आहे. यातील काही सहभागी नागरिकांनी सौम्य संज्ञानात्मक कमजोरीची चिन्हे नोंदवली त्यांचा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता जास्त असल्याचेही या संशोधकांनी दावा केला आहे. एपीओईइ४ जनुक नसलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीचा परिणाम जास्त असल्याचेही या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले. एपीओईइ४ जनुक असलेल्या नागरिकांच्या आतड्यातून व्हिटॅमिन डी अधिक चांगले शोषले जाते, असा दावाही या संशोधकांनी केला आहे. या गृहितकाची चाचणी घेण्यासाठी कोणत्याही रक्तवाहिन्या काढल्या गेल्या नसल्याचेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या संशोधनात व्हिटॅमिन डीची कमी पातळी स्मृतीभ्रंशाच्या उच्च जोखमीशी निगडीत असल्याचेही आढळून आल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. व्हिटॅमिन डीचा मेंदूतील अमायलोइड क्लिअरन्समध्ये गुंतलेला आहे. त्याचा संचय स्मृतीभ्रंषाच्या लक्षणांपैकी एक आहे. व्हिटॅमिन डी मेंदूला स्मृतीभ्रंशाच्या विकासात आणखी एक प्रोटीन तयार होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकत असल्याचेही या संशोधनात आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
हेही वाचा - Problems During Menstruation : मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम