महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Elon Musk Twitter News: आपल्याला ट्विटरचे व्यसन...ट्विटवर वाचण्याच्या मर्यादा लागू केल्यानंतर एलॉनचे ट्विट चर्चेत - Twitter Data Scraping Policy

ट्विटरच्या सेवेक शनिवारी काही काळ त्रुटी निर्माण झाल्यानंतर ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे. वापरकर्त्यांना ट्विटरच्या पोस्ट पाहण्यावर मर्यादा लागू होणार आहेत, याबाबतचे ट्विट ट्विटरचे चेअरमन एलॉन मस्क यांनी केले आहे.

Elon Musk Twitter News
एलॉन मस्क ट्विट

By

Published : Jul 2, 2023, 7:46 AM IST

Updated : Jul 2, 2023, 7:55 AM IST

नवी दिल्ली- ट्विटरवर लॉग इन होत नसल्याने इलॉन मस्कवर भारतासह जगभरातील लाखो वापरकर्त्यांनी टीका केली आहे. त्यानंतर एलॉन मस्कने ट्विट वाचण्यावर मर्यादा लागू केल्याने जगभरातून मस्कच्या निर्णयावर टीका होत आहे. सुरुवातीला मस्कने डाटा स्क्रॅपिंगचे कारण दिले. मात्र, जगभरातून टीका वाढत असताना त्याने ट्विटवरील मर्यादेचा वेगळे कारण दिले आहे.

एलॉन मस्कने ट्विटरवरील वाचण्याची मर्यादा करण्याचे कारण दिले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले, की, दृश्य मर्यादा सेट करण्याचे कारण आहे. आपल्याला ट्विटरचे व्यसन लागले आहे. यातून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. मी चांगल्या जगासाठी चांगले काम करत आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये अंतराळातील सुर्याचे व ग्रहाचे मस्कने ट्विट केले आहे. वेबसाइट व सोशल मीडियाबाबत 'डाउन डिटेक्टर' ही वेबसाईट अपडेट माहिती देत असते. या वेबसाईटच्या माहितनुसार जगभरातील 7,000 हून अधिक वापरकर्त्यांनी ट्विटरबाबत समस्या नोंदवल्या आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केले, "कोणीतरी एलॉनला जागे करा. कारण त्याचे 44 अब्जचे ट्विटर काम करत नसल्याचे दिसत आहेत.

काय आहेत नवीन नियम

  • व्हेरिफाईड अकाउंट असलेले वापरकर्ते दररोज 600 पोस्ट वाचू शकणार आहेत.
  • व्हेरिफाईड अकाउंट असलेले दररोज 600 पोस्ट वाचू शकणार आहेत.
  • नवीन व्हेरिफाईड अकाउंट असलेले वापरकर्ते दररोज 300 पोस्ट वाचू शकणार आहेत.

वापरकर्त्यांनी #TwitterDown, #TwitterDown आणि #RateLimitExceeded हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत समस्या येत असल्याचे म्हटले. यावर मस्क यांनी सांगितले की "डेटा स्क्रॅपिंगच्या अत्यधिक पातळीमुळे कठोर कारवाई आवश्यक आहे. हा तात्पुरता उपाय असल्याचे मस्क याने म्हटले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले, की पृथ्वीवरील एआयचे काम करणारी जवळपास प्रत्येक कंपनी, स्टार्टअप्सपासून ते काही मोठ्या कॉर्पोरेशनपर्यंत मोठ्या प्रमाणात डाटा स्क्रॅप करत आहे. एका वापरकर्त्याने म्हटले, की ट्विटर डाउन आहे का? हीच समस्या कुणाला आहे का? एलॉन मस्ककडे ट्विटरची मालकी आल्यानंतर सतत नवीन नियम लागू होत आहेत. अलीकडेच ट्विटरसाठी नवीन सीईओचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या नियमासाठी सतत नियमात बदल-ट्विटरवरमधील सतत बदलामुंळे लाखो वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. इलॉन मस्क यांनी शनिवारी सांगितले की वापरकर्ते किती पोस्ट वाचू शकतात यावर तात्पुरती मर्यादा लागू केली आहे. डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशन टाळण्यासाठी हे केले जात असल्याचा मस्कने दावा केला आहे. जगभरातील वापरकर्त्यांना ट्विटरचे लॉग इन करता आले नाही. एलॉन मस्ककडून ट्विटर अधिक नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे ट्विटरकडून सेवेत कपात होत असल्याने वापरकर्ते नाराज असल्याटे विविध ट्विटमधून दिसून आले आहे.

हेही वाचा-

  1. PM Modi USA Visit: मी मोदींचा चाहता, पंतप्रधान मोदींना खरोखर भारताची काळजी- एलन मस्क
  2. 31 years of SRK in film industry completed : किंग खानने इंडस्ट्रीमध्ये ३१ वर्षे पूर्ण केल्यामुळे 'आस्क एसआरके'शो ट्विटरवर केला होस्ट
  3. SPKK MOVIE : प्रेक्षकांनी ट्विटरवर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला म्हटले ब्लॉकबस्टर
Last Updated : Jul 2, 2023, 7:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details