नवी दिल्ली : ट्वीटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी शनिवारी सांगितले की, ट्विटरचे ओपन सोर्स अल्गोरिदम पुढील महिन्यात उघड होईल. ट्वीटरवर सध्या बऱ्याच लोकांना अॅप वापरण्यास व लॉग इन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. मस्क म्हणाले की, ट्विटर ट्विट शिफारस कोड प्रकाशित करेल. यामुळे पुढील महिन्यापासून खाते/ट्विटची स्थिती पाहता येईल.
थर्ड पार्टी ट्विटर टूल्स वापरणाऱ्या लोकांना समस्या : ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी पोस्ट केले की, पारदर्शकता विश्वास निर्माण करते. ते म्हणाले की कंपनी पुढील आठवड्यात इमेज लेंथ क्रॉप आणि इतर किरकोळ दोष दूर करेल. मस्क म्हणाले की, बुकमार्क देखील सर्च करता येतील. दरम्यान, Tweetbot सारखे थर्ड पार्टी ट्विटर टूल्स वापरणाऱ्या लोकांना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. Tapbots द्वारे Tweetbot ने पोस्ट केले की Tweetbot आणि इतर ग्राहकांना Twitter वर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. आम्ही अधिक माहितीसाठी Twitter वर संपर्क साधला आहे परंतु प्रतिसाद मिळाला नाही.