सॅन फ्रान्सिस्को : इलॉन मस्क मस्क संचालित टेस्लाने भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनी भारताला पुढील आघाडीची पुरवठा साखळी इकोसिस्टम उत्पादक बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तनेजा सध्या टेस्ला येथे मुख्य लेखा अधिकारी म्हणून काम करतात आणि अतिरिक्त जबाबदारी म्हणून सीएफओ पद स्वीकारतील. ते जॅचरी किरखॉर्नची जागा घेतील जे टेस्लासह त्यांचा 13 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रेंज : या कंपनीचा एक भाग बनणे हा एक विशेष अनुभव आहे आणि 13 वर्षांपूर्वी सामील झाल्यापासून आम्ही एकत्र केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे, किरखॉर्न यांनी व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. टेस्लाने नजीकच्या भविष्यात आपले ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रेंज देशात आणण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मस्क यांनी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेत झालेल्या भेटीदरम्यान पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले होते. मस्क यांनी मोदींसोबतच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले की, त्यांना खरोखर भारताची काळजी आहे कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. आम्ही ते करू इच्छितो आणि फक्त योग्य वेळ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
टेस्लाचे नवीन सीएफओ वैभव तनेजा कोण आहेत?वैभव तनेजा हे मूळचे भारतातील असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण करून ते अमेरिकेला गेले. प्राइस वॉटर हाऊस कूपर्स कंपनीपासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. येथे त्यांनी जुलै 1999 ते मार्च 2016 पर्यंत काम केले.
टेस्लापासून वैभव यांचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला ? 2016 नंतर, ते सौर ऊर्जा कंपनी सोलर सिटीमध्ये गेले, जी 2017 मध्ये टेस्लाने विकत घेतली. यातून वैभव यांचा प्रवास टेस्लासोबत सुरू झाला. पुढे त्यांच्या क्षमतेच्या जोरावर त्यांना प्रमोशन मिळत राहिले. 2019 पासून, ते टेस्लामध्ये मुख्य लेखा अधिकारी (CAO) म्हणून काम करत आहेत. या क्रमाने आता कंपनीने त्यांना सीएफओची खुर्ची दिली आहे. तनेजा हे फेब्रुवारी २०१७ ते मे २०१८ या कालावधीत कंपनीत असिस्टंट कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणूनही कार्यरत होते. जानेवारी 2021 मध्ये, त्यांची टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एकूणच, वैभवकडे लेखा, तंत्रज्ञान, वित्त, रिटेल आणि दूरसंचार या क्षेत्रांतील अनुभवाचा विस्तृत अनुभव आहे. टेस्लाला आशा आहे की ते सीएफओ पद चांगल्या प्रकारे हाताळतील आणि कंपनीला नवीन उंचीवर नेतील.