नवी दिल्ली :मायक्रोसॉफ्टच्या मालकीची असलेल्या ओपन एआयने चॅट जीपीटीतील सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी 20 हजार डॉलरची ऑफर दिली आहे. कंपनीला गुड फेथ हॅकिंग आणि तांत्रिक हल्ल्यातील फरक ओळखण्यात यामुळे मदत होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात सुरक्षेतील त्रुटीचा सामना चॅट जीपीटीला करावा लागला होता. ओपन एआयने चॅट जीपीटी आणि इतर उत्पादनांसाठी बग बाउंटी कार्यक्रम सुरू केला आहे. ओपन एआय या निष्कर्षांसाठी बगक्राऊड व्हल्नरेबिलिटी रेटिंग टॅक्सोनॉमी वापरणार असल्याची माहितीही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
थर्ड पार्टी शोधू शकतात बग :ओपन एआयने जाहीर केलेल्या या बक्षिसाव्यतिरिक्त चॅट जीपीटी आणखीही बक्षिस देणार असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यात कमी महत्वाचा बग शोधल्यास 200 डॉलर किवा त्यापेक्षाही मोठा बग शोधल्यास कंपनी मोठी रक्कम देणार असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एखादा खूप महत्वाचा बग शोधल्यासच कंपनी 20 हजार डॉलरचे बक्षिस देणार आहे. सुरक्षा संशोधकांनी तयार केलेल्या प्लगइनवर सुरक्षा चाचणी घेण्यास अधिकृत नाहीत. ओपनएआय एथिकल हॅकर्सना गोपनीय ओपनएआय कॉर्पोरेट माहितीचे रक्षण करण्यास सांगत आहे. ती थर्ड पार्टीद्वारे उघड होऊ शकते. यात गुगल वर्कप्लेस, असाना, ट्रेलो, जीरा, झेंडेस्क आदी विविध वर्कप्लेसचा समावेश असल्याची माहितीही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.