महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Open AI Chat GPT Plus : ओपन एआयचे चॅट जीपीटी प्लस आता भारतीयांनाही मिळणार - मायक्रोसॉफ्ट

ओपन एआयने आपल्या चॅट जीपीटीची सदस्यता आता भारतातही सुरू केली आहे. त्यामुळे भारतीयांनाही आता चॅट जीपीटीचा आनंद उपभोगता येणार आहे.

OpenAI ChatGPT
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 18, 2023, 5:02 PM IST

नवी दिल्ली :मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असलेल्या चॅट जीपीटीने आता आपली सदस्यता भारतात उपलब्ध असल्याची घोषणा शुक्रवारी जाहीर केली. यावेळी कंपनीने चॅट जीपीटी प्लस Chat GPT Plus मजकूर-जनरेटिंग एआयमध्ये AI आता भारतातही सदस्यता उपलब्ध करुन देत असल्याचे स्पष्ट केले. चॅट जीपीटी प्लस सबस्क्रिप्शन आता भारतात उपलब्ध असल्याने भारतीयांनाही त्याचा उपयोग करुन घेता येणार आहे. आजच GPT-4 सह नवीन वैशिष्ट्यांवर लवकर प्रवेश मिळवण्याचे आवाहनही ओपन एआयच्या Open AI ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आर्टीफीशियल इंटीलिजन्समध्ये मैलाचा दगड :मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयने केलेल्या या नवीन मॉडेलची सदस्यता आता भारतात मिळत असल्याने भारतीयांना आर्टीफीशियल इंटेलिजन्सचा आनंद उपभोगता येणार आहे. ओपन एआयने Open AI या आठवड्याच्या सुरुवातीला विकसित केलेले AI मॉडेल, Chat GPT Plus मध्ये समाविष्ट करण्यात आले केले आहे. आम्ही GPT-4 शिक्षण विकसित करण्याच्या ओपन एआयच्या Open AI च्या प्रयत्नातील मैलाचा दगड असल्याचे कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. GPT-3.5 च्या तुलनेत नवीन AI मॉडेल अधिक विश्वासार्ह, सर्जनशील आणि जटिल सूचना हाताळण्यास सक्षम असल्याचेही कंपनीने यावेळी नमूद केले आहे.

मजकूर आणि फोटोही स्वीकारणार : ओपन एआयने विकसित केलेले चॅट जीपीटीचे हे मॉडेल मजकूर आणि फोटोही इनपूट स्वीकारणार आहे. हे मॉडेल वापरकर्त्यांना कोणत्याही भाषे कार्य करण्यास अनुमती देते. जीपीटी-4 बेस मॉडेल, पूर्वीच्या जीपीटी मॉडेल्सप्रमाणे पुढील शब्दाचा अंदाज लावायला सक्षम असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

विकसित चॅट जीपीटी अधिक सक्षम :GPT-4 विद्यमान मोठ्या भाषा मॉडेल्स (LLMs) पेक्षा जास्त कामगिरी करते. यात बहुतेक अत्याधुनिक (SOTA) मॉडेल्स समाविष्ट आहेत. यात बेंचमार्क विशिष्ट प्रशिक्षण पद्धती समाविष्ट असू शकते. शिवाय सशुल्क विभागाच्या ग्राहकांना GPT-4 सह नवीन वैशिष्ट्यांमध्ये लवकर प्रवेश मिळतो. चॅटजीपीटी प्लस फेब्रुवारीमध्ये यूएसमध्ये मोठ्या कालावधीनंतर रिलीज झाले होते. सध्या त्याची किंमत दरमहा 20 डॉलर असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Microsoft Adds AI Tools : मायक्रोसॉफ्टने आउटलुक वर्ड सारख्या ऑफिस अ‍ॅप्समध्ये एआय टूल्सचा समावेश केला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details