वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ कंपनी नासाच्या पर्सेविरेन्स रोवरने मंगळ ग्रहावरून काही आश्चर्यजनक छायाचित्रे पाठविली आहेत. हे यान मंगळावर उतरताना हायरिझोल्यूशनचे रंगीत फोटोही पाठविले आहेत. हा सेल्फी अनेक कॅमेरांमधून काढलेल्या व्हिडिओचा भाग आहे. नासाचे पर्सेव्हिरेन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळावर उतरले आहे.
नासाने म्हटले आहे की, क्यूरोसिटी रोवरने मंगळ ग्रहावर उतरताना स्टॉम मोशन फिल्म पाठविली आहे. तर पर्सेव्हिरेन्स रोवरच्या कॅमेराने टचडाऊनचा व्हिडिओ कैद केला आहे. यावरून काही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. ही छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत.
पर्सेव्हिरेन्स रोवरने बहुतांश रंगीत छायाचित्रे पाठविले आहेत. यापूर्वी रोवरने पाठविलेली छायाचित्रे कृष्णधवल होती. एका फोटोमध्ये रोव्हरचे चाक मंगळावरील माती साफ करत असल्याचे दृश्य आहे. मंगळावर पर्सेव्हिरेन्स रोवर मोहिमेमागे अंतराळ विज्ञानाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्यामध्ये प्राचीन सूक्ष्मजंतुच्या जीवनाचा शोध घेणे हा उद्देश आहे.
रोव्हर मंगळावरील माती स्वच्छ करताना रोवरमधून मंगळ ग्रहावरील वातावरण आणि भूविज्ञानाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नवीन मानवी संशोधनाच्या वाटा शोधल्या जाणार आहेत. त्यासाठी मंगळावरील डोंगरावरून माती आणि धूळ गोळा केली जाणार आहे.
मंगळावरील मोहिमेची संशोधकाकडून देखरेख नासा, युरोपियन अंतराळ संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून मंगळावरील नमुने हे पृथ्वीवर आणले जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये अभियंते रोवरमधील सिस्टिम डाटा अपडेट करणार आहेत. त्याशिवाय विविध सॉफ्टवेअर आणि विविध उपकरण अपडेट करणार आहेत. येत्या काही महिन्यांत पर्सेव्हेरिन्स रोवर रोबोटिक हातांमधून परीक्षण करण्यात येणार आहे. रोवर यान हे कमीत कमी दोन महिने त्याठिकाणी राहणार आहे. त्यानंतर विज्ञानाची नवीन मोहीम सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मंगळाच्या डोंगरावरील मातीचे नमुने घेतले जाणार आहेत.