सॅन फ्रान्सिस्को : ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ट्विटरचे मालक एलन मस्क यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. ओपनएआय ही कंपनी मायक्रोसॉफ्ट पेक्षा स्वतंत्र असल्याचेही सीईओ सॅम ऑल्टमन यांनी यावेळी स्पष्ट केले. 'ऑन विथ कारा स्विशर' या कार्यक्रमादरम्यान ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी एलन मस्क यांच्यावर हा पलटवार केला आहे. एलन मस्क यांनी ट्विटरवरुन ओपन एआयवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी प्रत्युत्तर दिल्याने तंत्रज्ञान विश्वात चर्चा सुरू झाली आहे.
चॅट जीपीटीवर नियंत्रण मिळवण्याचा केला प्रयत्न :ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी यावेळी एलन मस्क यांच्याबाबत अनेक खुलासेही केले आहेत. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ओपन एआयवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही सीईओ सॅम ऑल्टमन यांनी केला आहे. एलन मस्क आमच्यावर सरळ टीका करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एलन मस्क यांना आर्टीफिशयल इंटेलिजन्स बाबत चिंता असल्याचेही यावेळी सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केले. ही एलन मस्क यांची सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एलन मस्क यांच्याकडे असलेली शैली आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही शैली आपल्याकडे असावी असेही सीईओ सॅम ऑल्टमन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एलन मस्कने २०१८ च्या सुरुवातीला चॅट जीपीटीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा दावाही सीईओ सॅम ऑल्टमन यांनी केला. मात्र इतर संस्थापकांनी एलन मस्कचा हा प्रस्ताव फेटाळल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.