वॉशिंग्टन : भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धकाधकीचे जीवन, केमिकलयुक्त आहार आणि जीवनशैलित आलेल्या अनियमितपणामुळे कर्करोग जगभरातही पसरला आहे. कर्करोगावर योग्य उपचार नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले होते. आता मात्र लेझर उपचार पद्धती कर्करोग टाळण्यास मदत करत असल्याचा मॅसॅच्युसेट्स येथील संशोधकांनी दावा केला आहे. त्यामुळे कर्करोगचा धोका असलेल्या नागरिकांना हा सगळ्यात मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.
भारतात दररोज होतो १ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू :देशात कर्करोग आजाराने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढेल आहे. देशातील दर १५ नागरिकांमधील एकाला कर्करोगाने ग्रासल्याचा आहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यासह दिवसभरात १३०० कर्करोग रुग्णांचा भारतात मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरुन भारतात कर्करोगाने किती मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपली शिकार बनवले आहे, याची प्रचिती येते.
काय आहे मॅसॅच्युसेट्सच्या संशोधकांचा दावा :मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संशोधकांनी कर्करोगावर संशोधन केले आहे. त्यानुसार बेसल सेल कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा यांना संयुक्तपणे केराटिनोसाइट कार्सिनोमा म्हणून ओळखले जाते. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त रुग्ण केराटिनोसाइट कार्सिनोमा या कर्करोगाचे मिळतात. या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार लेझर उपचार पद्धतीने या रुग्णांना नागरिकांच्या त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करते. ही पद्धत सोपी असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. त्यांचे संशोधन त्वचाविज्ञान शस्त्रक्रिया मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे.