हैदराबाद :भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य (नौदल, लष्कर आणि हवाई दल) करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या शहीद आणि शूर सैनिकांचा सन्मान केला जातो ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी शत्रूंशी लढा दिला आणि देशाच्या नावावर सर्वस्व अर्पण केले.
या दिवसाचा इतिहास काय आहे? भारतावर अनेक दशके ब्रिटीशांची राजवट होती. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर भारताची स्वतःची राज्यघटना तयार करण्यात आली. भारताला लोकशाही देश म्हणून नियुक्त करण्यात आलं. मग देशाची सीमा हे सर्वात मोठं आव्हान म्हणून आपल्यासमोर आलं. त्यासाठी लष्कराची निर्मिती झाली, ती सातत्यानं बळकट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी भारत सरकारनं भारतीय लष्करातील सैनिकांच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली. जेणेकरुन देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी आपण काही खास करू शकू. या समितीनं लोकांमध्ये छोटे झेंडे वाटून पैसे गोळा केले. या ध्वजांना तीन रंग होते (लाल, हिरवा आणि निळा). हे रंग तिन्ही सैन्यांचे प्रतीक आहेत.