बंगळुरू : जगात नुकतीच ५जी सेवा आल्यानंतर नेटवर्क प्रगत झाले आहे. मात्र दुसरीकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील संशोधक 6G तंत्रज्ञानाला सक्षम बनवणारा अँटेना डिझाइन करण्यावर काम करत आहेत. हा अँटेना व्हेईकल टू एव्हरीथिंग ( V2X ) कम्युनिकेशन्स साकारण्यात महत्त्वाचा आहे. बंगळुरू येथील इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील सहायक प्राध्यापक देबदीप सरकार यांच्या नेतृत्वाखालील पथक यावर कार्य करत आहे. पूर्ण डुप्लेक्स कम्युनिकेशन अँटेनामधील हस्तक्षेप कसा कमी केला जाऊ शकतो, यावर हे संशोधन करण्यात येत आहे. त्यामुळे जलद आणि कार्यक्षम नेटवर्क मिळणार असल्याचा दावा या संशोधकांकडून करण्यात येत आहे.
काय आहे डुप्लेक्स कम्युनिकेशन अँटेना :बंगळुरू येथील इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील संशोधक करत असलेल्या संशोधनातील अँटेना हा कमांड्सच्या आवश्यकतेसाठी खूप उपयुक्त आहे. फुल डुप्लेक्स अँटेनामध्ये रेडिओ सिग्नल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ट्रान्समीटरसह रिसीव्हर असतात. पारंपरिक रेडिओ ट्रान्सीव्हर्स हाफ डुप्लेक्स असतात. याचा अर्थ ते पाठवणे आणि प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल वापरले जातात. प्रसारित होणारे सिग्नल आणि मिळालेले सिग्नल यांच्यामध्ये वेळेचे अंतर असते, असेही इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील संशोधकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
पूर्ण डुप्लेक्स सिस्टम आहेत आवश्यक :मागे आणि पुढे जाणार्या सिग्नल्समध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, याची खात्री करण्यासाठी या वेळेचा अंतर आवश्यक आहे. एकमेकांचे ऐकण्यासाठी न थांबता दोन जण एकाच वेळी एकमेकांशी बोलतात. परंतु यामुळे सिग्नल ट्रान्सफरची कार्यक्षमता आणि गती देखील धोक्यात येत असल्याचेही या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे. डेटा अधिक जलद आणि अधिक कार्यक्षमतेने प्रसारित करण्यासाठी पूर्ण डुप्लेक्स सिस्टम आवश्यक आहेत. जेथे ट्रान्समीटर आणि प्राप्तकर्ता दोन्ही एकाच वेळी एकाच वारंवारतेचे सिग्नल ऑपरेट करू शकतात. अशा प्रणालींसाठी स्वत:चा हस्तक्षेप दूर करणे महत्वाचे आहे. प्राध्यापक देबदीप सरकार आणि त्यांचे पोस्ट डॉक्टरल फेलो जोगेश चंद्र दाश हे गेल्या काही वर्षांपासून यावर काम करत असल्याचेही या निवेधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
किफायतशीर अँटेना आवश्यक :आम्हाला स्व-हस्तक्षेप म्हणून येणारे सिग्नल दूर करण्याचा या संशोधनाचा व्यापक उद्देश असल्याचे सरकार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. निष्क्रिय आणि सक्रिय हे स्व-हस्तक्षेप रद्द करण्याचे दोन मार्ग असल्याचेही त्यांनी यावेळी स्फष्ट केले. एका विशिष्ट प्रकारे सर्किट डिझाइन करून निष्क्रिय रद्दीकरण कोणत्याही अतिरिक्त साधनाशिवाय केले जात असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. मात्र सक्रिय रद्दीकरण स्वयं-हस्तक्षेप रद्द करण्यासाठी सिग्नल प्रोसेसिंग युनिट्ससारख्या अतिरिक्त घटकांवर अवलंबून असते. परंतु या चरणांसाठी आवश्यक असलेला अँटेना अवजड आणि महाग असतो. त्याऐवजी कोणत्याही उपकरणाच्या उर्वरित सर्किटरीमध्ये सहजपणे जोडला जाणारा एक कॉम्पॅक्ट आणि किफायतशीर अँटेना आवश्यक असल्याचेही सरकार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Twitter Blue badges : 1 एप्रिलपासून काढले जातील लेगसी ट्विटर ब्लू बॅज...