हैदराबाद :ट्विटरने गुरुवारी आपल्या धोरणात बदल करुन ब्लू मार्क काढून टाकले आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींसह पत्रकारांच्या खात्यावरील ब्लू मार्क काढून टाकण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे माहितीची सत्यता असण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एलन मस्कने नोव्हेंबर 2022 मध्ये ट्विटर खरेदी केल्यापासून ट्विटरला फायदेशीर कंपनी बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ब्लू मार्क आहे स्टेटस सिम्बॉल :एलन मस्क यांनी अगोदर एक एप्रिलपासून ब्लू चेक मार्क काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी ही मुदत 20 एप्रिलपर्यंत वाढवली होती. त्यामुळे 20 एप्रिलपासून ट्विटरने ब्लू मार्क काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. एलन मस्कने ट्विटर ताब्यात घेण्यापूर्वी वापरकर्त्यांच्या खात्यांचे सत्यापन सार्वजनिक हिताचे होते. त्यामुळे चिन्हांकित करण्यात आलेले राजकारणी, पत्रकार, अभिनेत्यांच्या खात्यांची पडताळणी करत होते. ब्लू चेकने वापरकर्त्यांच्या खात्याला सत्यता प्रदान करण्यात येत होती. मात्र आता या पडताळणीशी तडजोड करण्यात आलेली आहे. ब्लू चेकमार्क हे स्टेटस सिम्बॉल असल्याचा एलन मस्कचा यांचा असा विश्वास आहे. त्यामुळे त्यासाठी कोणीही पैसे मोजायला तयार होणार असल्याचेही मस्क यांचे मत आहे.