हैदराबाद : गुगलच्या एआय टूल जेमिनीमुळे कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आणखी तीव्र स्पर्धा होणार आहे. ओपन एआयच्या(OpenAI) चॅटजीपीटीनंतर (ChatGPT) गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला एआय टूल बार्ड (Bard)लाँच केले. आता कंपनीने आपले नवीन एआय टूल 'जेमिनी' लाँच केले आहे. जेमिनी LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्यूलवर काम करते. गुगलने जूनमध्ये झालेल्या I/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स इव्हेंटमध्ये ह्या टूलची जगाला ओळख करून दिली होती. जेमिनी हे AI मॉडेल्सच्या विकासातील हे एक मोठे पाऊल आहे. त्याचा परिणाम सर्व गुगल उत्पादनांवर होईल. म्हणजे गुगलच्या सर्व उत्पादनांमध्ये 'जेमिनी'चा प्रभाव दिसेल असं नवीन टूल लाँच करताना गुगल डिपमाइंडचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले.
तीन प्रकारात लाँच केले : कंपनीने गुगल जेमिनी तीन व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. त्याची सर्वात लहान आवृत्ती नॅनो आहे. त्यामध्ये Android डिव्हाइसवर ऑफलाइनदेखील कार्य करण्याची क्षमता आहे. त्याचे जेमिनी प्रो असे व्हर्जनदेखील आहे. तुम्ही लवकरच हे गुगलच्या सर्व AI सेवांमध्ये पाहू शकाल. तुम्ही ते बार्डवर वापरू शकता. या सगळ्याच्यावर गुगल जेमिनी अल्ट्रा आहे. हे गुगलचे सर्वात शक्तिशाली AI टूल आहे. त्यात मानवासारख्या बुद्धिमत्तेच्या काही क्षमता आहेत. हे डेटा सेंटर आणि एंटरप्राइझ अनुप्रयोगांसाठी डिझाइन केले आहे.