महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Technology: हे पाच अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये आहेत का? असतील तर ताबडतोब हटवा! - malware

सध्या वाढत्या टॅक्नोलोजी ( Technology ) च्या जगात फसवणूक करणारे अ‍ॅप्स ( Apps ) वाढले आहेत. गुगल नियमितपणे प्लेस्टॉर ( Play Store ) मध्ये असे अ‍ॅप शोधते आणि त्यावर बंदी घालते. अलीकडेच गुगल ( Google ) ने आणखी पाच अ‍ॅप्स काढून टाकले आहेत.

malware Apps
मालवेअर अॅप्स

By

Published : Jun 24, 2022, 10:45 AM IST

Updated : Jun 24, 2022, 3:00 PM IST

सध्या वाढत्या टॅक्नोलोजि ( Technology ) च्या जगात फसवणूक करणारे अॅप्स ( Apps ) वाढले आहेत. गुगल नियमितपणे प्लेस्टॉर ( Play Store ) मध्ये असे अॅप शोधते आणि त्यावर बंदी घालते. अलीकडेच गुगल( Google) ने आणखी पाच अॅप्स काढून टाकले आहेत. हे स्पायवेअर अॅप्स म्हणून काम करतात जे इतर मोबाइल अॅप्समधून डेटा चोरतात. जर हे तुमच्या मोबाईलवर असतील तर लगेच मोबाईलमधून काढून टाकायला हवेत.

तुमच्याकडे हे अॅप्स आहेत का?

PIP Pic Camera Photo Editor: हे अॅप इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. पाईप पीक कॅमेरा फोटो एडीटींग हे मालवेअर फेसबुक लॉगिन तपशील चोरत आहे. दहा लाखांहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केल्याची माहिती समोर आली आहे..

Wild & Exotic Animal Wallpaper:वाईल्ड एंड एग्झॉटीक अॅनीमल वॉलपेपर या अॅपमध्ये मास्करेडिंग नावाचे अॅडवेअर आहे. यामुळे मोबाईलवरील इतर अॅप्सचे आयकॉन आणि नाव बदलले जाते. त्यातूनच अनेक समस्या निर्माण होतात. ज्याने हे अॅप वापरणारे लोक गोंधळून जातात. सध्या 5 लाखांहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.

Zodi Horoscope - Fortune Finder:झोडीक होरोस्कॉप फॉर्च्यून फांयडर या अॅपद्वारे स्मार्टफोनमध्ये हॅक करणारे मालवेअर फेसबुक खात्याचे तपशील चोरले जातत. ते 5 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड देखील केले आहे.

PIP कॅमेरा 2022:फोटोप्रेमी या अॅपचा वापर कॅमेराचा अधिक चांगला वापर करण्यासाठी करतात. या अॅपचा वापर सुरू करताच फेसबुकद्वारे त्यातील माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जाते. 50,000 हून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केल्याची माहिती आहे. आणि या अॅपचा वापर देखील केला जातो.

Magnifier Flashlight:हे अॅप मुख्यतः व्हिडिओ आणि स्थिर बॅनर जाहिरातींसह येते. सायबर गुन्हेगार फसवणूकासाठी त्यांच्या फोनवर अॅडवेअर पाठवतात आणि त्यांच्याकडून डेटा गोळा करतात. हे अॅप 10,000 हून अधिक लोकांनी डाउनलोड केले असल्याचे सांगितले जाते

अॅप्समध्ये मालवेअर कसे कार्य करते? - एँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांचा, मालवेअर अॅप्स नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे डेटा चोरत असतात. अॅप्स अनेकदा जाहिराती आणतात आणि वारंवार वापरकर्त्यांना त्यावर क्लिक करण्यास सांगतात. वापरकर्त्याने त्यावर क्लिक केल्यास, मालवेअर फोनमध्ये प्रवेश करतो. आणि मोबाईलमधली महत्त्वाची माहिती चोरतो. सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची महत्त्वाची माहिती आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित डेटा घेतात. पुढे त्याचा गैरवापर करतात.

मालवेअर कसे रोखू शकतो? -तुमच्या फोनमध्ये व्हायरस असू शकतो अशी तुम्हाला शंका असल्यास तुम्ही अँटी-व्हायरस किंवा अँटी-मालवेअर प्रोग्राम इन्स्टॉल करू शकता. अशी शिफारस टेक तज्ञ नेहमी करतात. ते फोन पूर्णपणे स्कॅन करतात आणि अहवाल देतात. कोणतेही दुर्भावनापूर्ण प्रोग्राम शोधतात आणि त्यासंबंधीत माहिती देतात. मालवेअरपासून मुक्त होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे फोन फॅक्टरी रीसेट करणे. यात फोनमधील सर्व अॅप्स हटवेल जातात आणि नंतर सेटिंग्जद्वारे आपण आपला डेटा परत घेऊ शकतो.

हेही वाचा -5G Networks : 2027 पर्यंत भारतातील सुमारे 39 टक्के मोबाइल 5G सदस्यतांचे प्रतिनिधित्व करतील

Last Updated : Jun 24, 2022, 3:00 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details