महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

BGMI : या गेममुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते, सरकारही सतर्क - crafton

बंदी घातलेला बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) गेम देशात परत आला आहे. अनेकजण हा गेम मानसिक स्वास्थ्यासाठी मोठा धोका असल्याचे म्हणत आहेत. विशेषत: पालकवर्ग यामुळे चिंतेत आहे.

BGMI
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया

By

Published : Jun 19, 2023, 4:42 PM IST

नवी दिल्ली : एका वर्षापेक्षा अधिक काळापासून बंदी असलेला बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) गेम भारतात परतला आहे. सरकारने तीन महिन्यांपूर्वी याला ग्रीन सिग्नल दिला होता. 30 मे रोजी, दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम डेव्हलपर क्राफ्टनने सांगितले की, आता BGMI गेम आता भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तो Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत 10 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी या गेमला डाउनलोड केले आहे.

तीन महिने कठोर चाचणी घेणार : इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते की, BGMI ला देशात परत येण्याची परवानगी देण्याचा अंतिम निर्णय गेमच्या तीन महिन्यांच्या कठोर चाचणीनंतरच घेतला जाईल. मंत्री म्हणाले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सरकार पुढील तीन महिन्यांत वापरकर्त्याच्या व्यसनाधीनते बारीक लक्ष ठेवेल. सर्व्हर लोकेशन्स आणि डेटा सिक्युरिटी इत्यादी गोष्टींचे पालन केल्यानंतर BGMI च्या या तीन महिन्यांची चाचणीला स्वीकृती मिळाली आहे.

गेम खेळण्यासाठी वेळेचे बंधन : 18 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी BGMI खेळण्याचा वेळ तीन तासांपर्यंत मर्यादित असेल. तर उर्वरित खेळाडूंसाठी तो दररोज सहा तासांचा असेल. सप्टेंबर 2020 मध्ये, भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेच्या चिंतेचा हवाला देऊन PUBG Mobile - BGMI सह एकूण 118 चीनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. PUBG मोबाईलवर बंदी घातल्यानंतर क्राफ्टनने जुलै 2021 मध्ये प्रथमच पुनर्ब्रँडेड BGMI गेम जारी केला. हा गेम भारत सरकारच्या चिंता लक्षात घेऊन बदलांसह स्थानिक कायद्यांचे पालन करणारा आणि PUBG मोबाइलची भावना कायम ठेवत तयार करण्यात आला आहे.

पालकांची चिंता वाढली : BGMI च्या पुनरुज्जीवनाने भारताच्या वाढत्या गेमिंग क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या ब्रँड्समधील सहकार्याचा मार्ग मोकळा केला आहे. तथापि, बरेच लोक, विशेषत: पालक, मुलांची व्यसनाधीनता आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावरील संभाव्य परिणामामुळे या गेमचे परतणे धोक्याचे मानतात. बंदीपूर्वी, PUBG मोबाइलवर त्याचे व्यसनाधीन स्वरूप आणि युवा खेळाडूंवर त्याचा नकारात्मक परिणाम यासाठी मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता हा गेम पुन्हा परतल्याने अति गेमिंगच्या हानिकारक प्रभावांवरील चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

हेही वाचा :

  1. YouTube Update : यूट्यूबने नवीन धोरण आणले आहे, आता चॅनलची कमाई करण्यासाठी इतकेच सदस्य आवश्यक असतील
  2. Paytm UPI SDK : पेटीएमने भारतात जलद पेमेंट पद्धत आणली आहे, जाणून घ्या ती कशी काम करते

ABOUT THE AUTHOR

...view details